रुपया घसरला — आश्वासनं मोठी, वास्तव वेगळं?
- The Fifth Column

- Mar 15
- 1 min read
“2013-14 मध्ये देशभर सभा घेत भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी जोरदार टीका करत म्हणत होते — त्यांच्या टीकेचा मुद्दा होता डॉलर च्या तुलनेत घसरत चाललेला रुपया मोदी म्हणत होते की ‘रुपया घसरतोय म्हणजे देशाची प्रतिष्ठा घसरते आहे.’ आज डॉलर च्या तुलनेत रुपया मजबूत झालाय का ? की अजून घसरलाय ? समजून घेऊया

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्या वेळी तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करत होते त्या वेळी डॉलर सुमारे ₹60 होता… पण आज? जेव्हा नरेंद्र मोदी भारताचे शक्तिशाली पंतप्रधान म्हणून १२ वर्षांपासून कार्यकर्त आहेत या काळात डॉलर ₹92 च्या पुढे गेला आहे. मग प्रश्न सरळ आहे — तेव्हा रुपया घसरला तर ती देशाची प्रतिष्ठा घसरत होती आणि आज रुपया घसरतोय तरी पण आपण विश्वगुरू कसे ?

त्या काळातील भाषणांमध्ये मोदी म्हणाले होते — “आमची सत्ता आल्यावर अशी परिस्थिती निर्माण करू की अमेरिकेचे लोक भारताचा रुपया मिळवण्यासाठी रांगा लावतील.” हे विधान देशाच्या आर्थिक सामर्थ्याबद्दल मोठं स्वप्न दाखवत होतं.

रुपया घसरला की:
पेट्रोल-डिझेल महाग
गॅस सिलिंडर महाग
परदेशी शिक्षण महाग
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग
उद्योग खर्च वाढतो
नोकऱ्यांवर परिणाम म्हणजेच रुपयाची घसरण थेट जनतेच्या खिशावर परिणाम करते.

रुपया हा देशाच्या आर्थिक आरोग्याचा आरसा असतो

“तुमच्या मते रुपया घसरण्यासाठी जबाबदार कोण? सरकारची धोरणे? जागतिक परिस्थिती? की दोन्ही? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा.”

आपल्या The Fifth Column Marathi च्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि फेसबुक व इंस्टाग्राम वरती फॉलो करा.

Comments